आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. भारत देशामध्ये विविध प्रकारची झाडे, फुले ,फळे, प्राणी आणि पक्षी आढळून येतात . आपली संस्कृती आपल्याला बरेच काही शिकवते. लहान पनापासूनच आपली आई आपल्या बाळावर योग्य ते संस्कार व्हावे म्हणून धडपडत असते. त्यातलाच एक संस्कार म्हणजे आपण तहानलेल्या आणि भुकेलेल्याना अन्न आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी देणे होय.
आपण आपल्या दारी आलेल्या ना उपाशी जाऊ देत नाहीत. दान धर्म वेगळा आणि स्वछंद्पणे केलेली मदत वेगळी. ह्यातून मिळणार आनंद वेगळाच असतो.
आजच्या या बदलत्या प्रदूषण युक्त जगात आपले पक्षांकडे दुर्लक्ष होत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे पक्षांना राहण्यासाठी आणि जगण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. ह्या गोष्टीकडे एक सुजाण नागरिक म्हणून लक्ष देण्याची गरज आहे.
आपण थोडे निरीक्षण केले तर आपल्याला विविध प्रकारचे पक्षी सभोवताली दिसतात. हे पक्षी झाडावरती घरटे करून राहतात. जसे जसे नागरीकरण होत आहे तसे झाडांची संख्यादेखील कमी होत आहे. म्हणून प्रत्येक घरासमोर झाड असणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
उन्हाळ्यामध्ये पाण्याची भरपूर समस्या असते. त्यात पक्षी आणि प्राणी हे सुद्धा पाण्यासाठी स्थलांतर करत असतात. आपण प्रत्येकाने आपल्याबरोबरच पक्षांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल? तर सोपा उपाय आहे. "पक्षांसाठी पाणपोई ".
तसे पहिले तर हे अगदी सोपे काम आहे. आणि सर्वाना शक्य देखील आहे. सुरुवातीला कदाचित पक्षी येणार देखील नाहीत मात्र काही दिवसांनी नक्कीच पक्षी पाणी पिण्यासाठी येतील. निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. चांगल्या गोष्टीची सुरुवात हि छोट्या छोट्या प्रयत्नांतून होत असते. पाण्याप्रमाणेच आपण पक्षांसाठी काही प्रमाणात धान्य देखील ठेवू शकता.
आज हा उपक्रम जर आपण राबवला नाही तर येणाऱ्या पिढीला आपण पक्षांबद्दल काय माहिती देणार?
त्यामुळे आपण या निसर्गाचे देणे लागतो. म्हणून या मुक्या प्राणी आणि पक्षांकडे लक्ष देण्याची गरज आपल्या सर्वांची आहे. शक्य असल्यास वर्षभर किंवा उन्हाळ्यामध्ये तरी पक्षांसाठीची पाणपोई नक्कीच सुरु करा.
पक्षी वाचवा .
आपण आपल्या दारी आलेल्या ना उपाशी जाऊ देत नाहीत. दान धर्म वेगळा आणि स्वछंद्पणे केलेली मदत वेगळी. ह्यातून मिळणार आनंद वेगळाच असतो.
आजच्या या बदलत्या प्रदूषण युक्त जगात आपले पक्षांकडे दुर्लक्ष होत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे पक्षांना राहण्यासाठी आणि जगण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. ह्या गोष्टीकडे एक सुजाण नागरिक म्हणून लक्ष देण्याची गरज आहे.
आपण थोडे निरीक्षण केले तर आपल्याला विविध प्रकारचे पक्षी सभोवताली दिसतात. हे पक्षी झाडावरती घरटे करून राहतात. जसे जसे नागरीकरण होत आहे तसे झाडांची संख्यादेखील कमी होत आहे. म्हणून प्रत्येक घरासमोर झाड असणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
उन्हाळ्यामध्ये पाण्याची भरपूर समस्या असते. त्यात पक्षी आणि प्राणी हे सुद्धा पाण्यासाठी स्थलांतर करत असतात. आपण प्रत्येकाने आपल्याबरोबरच पक्षांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल? तर सोपा उपाय आहे. "पक्षांसाठी पाणपोई ".
काय आहे पक्षांसाठीची पाणपोई?
आपल्या घराच्या गच्चीवर, अंगणामध्ये, पायऱ्यावरती, किंवा झाडाच्या जवळ , शक्य असेल तर झाडावर एखाद्या बाउल मध्ये पाणी ठेवायला हवे. जेणे करून पक्षि हे पाणी पिऊ शकतील. ह्या बाउल मधले पाणी रोज बदलायला हवे. म्हणजे त्यात धूळ राहणार नाही. आणि एक दोन बाउल पाणी भरून ठेवणे अगदी कोणालाही अवघड काम नाही.तसे पहिले तर हे अगदी सोपे काम आहे. आणि सर्वाना शक्य देखील आहे. सुरुवातीला कदाचित पक्षी येणार देखील नाहीत मात्र काही दिवसांनी नक्कीच पक्षी पाणी पिण्यासाठी येतील. निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. चांगल्या गोष्टीची सुरुवात हि छोट्या छोट्या प्रयत्नांतून होत असते. पाण्याप्रमाणेच आपण पक्षांसाठी काही प्रमाणात धान्य देखील ठेवू शकता.
आज हा उपक्रम जर आपण राबवला नाही तर येणाऱ्या पिढीला आपण पक्षांबद्दल काय माहिती देणार?
त्यामुळे आपण या निसर्गाचे देणे लागतो. म्हणून या मुक्या प्राणी आणि पक्षांकडे लक्ष देण्याची गरज आपल्या सर्वांची आहे. शक्य असल्यास वर्षभर किंवा उन्हाळ्यामध्ये तरी पक्षांसाठीची पाणपोई नक्कीच सुरु करा.
पक्षी वाचवा .

No comments:
Post a Comment